Sindhudurg: केळुस येथे जानेवारी १५ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
54
केळुस येथे जानेवारी १५ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

नामांकित कंपन्यांकडून तरुणांना नोकरीच्या संधी

  • प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
  • वेंगुर्ला: केळुस ग्रामहितवर्धक मंडळ मुंबई व अरविंद रमाकांत प्रभू मित्रमंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील केळुस येथे १५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.येथील तारादेवी मंदिर या ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत हा रोजगार मेळावा होणार असून यात शिकाऊ प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत विविध नामांकित कंपन्यांकडून तरुण-तरुणींना नोकरीवर प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  • यासाठी एसएससी, एचएससी, आयटीआय चे सर्व ट्रेड, डिप्लोमा इंजीनियरिंग, बीएससी, बीसीए, एमसीए, बीई, बी टेक, बीएससी, मायक्रोबायोलॉजी, एमएससी व इतर शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आल्या आहेत. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांची वयोमर्यादा १८ ते ३५ पर्यंत राहणार आहे. तर यामध्ये निवड होणाऱ्यांना दरमहा १० ते १५ हजार पासून पगार उपलब्ध होणार आहे. तसेच कंपनीच्या धोरणानुसार कॅन्टीन व वाहतूक सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे तरी या रोजगार मेळाव्याचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
  • तरुण तरुणींनी आधार कार्ड/पॅनकार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व पासपोर्ट फोटो ६ या कागदपत्रासहित या मेळाव्यात सहभागी व्हावें. नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची काळाची गरज तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस नवे नवे बदल घडत असतात आणि म्हणून बदलत्या विकसित तंत्रज्ञानाशी सांगड घालणे गरजेचे असते. उद्योग जगताला नेमक्या कुठल्या कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे या पार्श्वभूमीवर रोजगारक्षम होण्यासाठी बेरोजगार तरुणांना सुसंगत कौशल्य अंगी धारण करणे गरजेचे आहे. विशेषतः व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून आजही दिले जाणारे प्रशिक्षण व वापरात नसलेल्या यंत्रसामग्रीचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यात येते तसेच शिकवीला जाणारा अभ्यासक्रम सुद्धा जुन्या व काल सुसंगत असल्याने साहजिकच अशा संस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी प्रत्यक्ष नोकरीला सुरुवात करू पाहतात तेव्हा नवीन तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसल्याने ते अकुशल ठरतात आणि यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी मिळताना अडचणी येतात म्हणून उद्योग जगताला अभिप्रेत असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षण असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याची काळाची गरज असल्याने आणि याच हेतूने केळुस येथे १५जानेवारीला भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे त्याचा लाभ अवश्य तरुण-तरुणींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here