वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारात वेंगुर्ला तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ, शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांनी आघाडी घेतली असून प्रत्येक हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या जात आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-हिंदूहृदयसम्राट-बाळा/
मुख्याध्यापक संघाचे सिंधुदुर्ग प्रभारी रमेश जाधव व गुलाब दवने (दोन्ही बदलापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत आसोली हायस्कूल, सरस्वती विद्यालय आरवली-टांक, बावडेकर हायस्कूल शिरोडा व माऊली विद्यामंदिर रेडी या चार शाळांमध्ये जाऊन शिक्षक मतदारांना ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रितेश राऊळ, रामसिग राणे, मनोज उगवेकर, बाबली वायंगणकर, लक्ष्मीकांत कर्पे, मयुरेश शिरोडकर, जगन्नाथ राणे, महादेव नाईक, सुजाता देसाई, गुरु घाडी, नंदा गावडे, प्रकाश धुरी, आनंद धुरी, सुषमा खानोलकर, प्रार्थना हळदणकर, शितल आंगचेकर, वृंदा गवंडळकर, शिक्षक प्रमोद कांबळे, किशोर सोनसुरकर, भावना धुरी, एस.एल.जाधव, एम.एन.कांबळी, चंद्रशेखर जाधव, निवृत्त शिक्षक एस.एस.काळे, विष्णू रेडकर उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
फोटोओळी – भाजपाच्या महिलांनी शिक्षकांची भेट घेऊन ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा प्रचार केला.