Sindhudurg: कोलझर गावातील अवैध दारू विक्री व्यावसाय बंद करा; अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करणार – कोलझर ग्रामस्थ व महिला आक्रमक पोलिसांना दिले निवेदन

0
42
दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली पोलीसांची कारवाई
दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली पोलीसांची कारवाई

दोडामार्ग प्रतिनिधी
कोलझर येथे अवैधरित्या दारु विक्री व्यावसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहारी गेल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे दारु विक्री व्यावसाय कायम स्वरुपी बंद करावा असे निवेदन श्री प्रशांत उर्फ राजू देसाई यांनी ग्रामस्थांच्या वतीने दोडामार्ग पोलिस निरीक्षक यांना दिले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-दुधाळ-जनावरांबाबत-शेतक/

कोलझर ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,” कोलझर गावात अवैधरित्या दारु विक्री धंदे सुरू आहे. पंचक्रोशीतील अनेक तरुण वर्ग दारुच्या नशेच्या आहारी गेले आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे.काही वर्षांपूर्वी दारु विक्री व्यावसाय बंद करावा अशी मागणी केली होती. काही ग्रामस्थांनी असे व्यवसाय करण्यारे यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.पोलीसांना कोण व्यवसाय करतात हे माहीत असुनही आपणास माहीत नाही असे सोंग करत आहेत. त्यामुळे दारु विक्री व्यावसाय बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार अशा इशारा निवेदनाद्वारे 50 ग्रामस्थांनी दिला आहे.”

यावेळी प्रशांत देसाई,दिपक देसाई संजय देसाई, मुरारी मुंगी, कुष्णा नाईक,दिपक देसाई,राजन दळवी, राजेंद्र देसाई,देवू नाईक,अशोक गवस, उल्हास देसाई,महादेव देसाई, अजुन देसाई, प्रेमानंद देसाई,सागर देसाई, गजानन धुरी,अजित सावंत,संदिप देसाई,निलेश चव्हाण, उर्मिला देसाई, दिवाकर देसाई अशा 50 ग्रामस्थांनी सही करून निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here