Sindhudurg: कोविड १९ आजाराच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अकराही जणांची प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता

0
16
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनिय
रायगड जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई

जन आशीर्वाद यात्रा आयोजन प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली होती

ओरोस – कोविड १९ आजाराच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, पणदूर सरपंच तुकाराम साईल आदींसह एकूण ११ जणांना येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए एम फडतरे यांनी ३० सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी ए एम फडतरे यांनी अकराही जणांची प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने वकील संग्राम देसाई, अशपाक शेख, अविनाश परब, सुहास साटम यांनी काम पाहिले.

जिल्हाधिकारी यांच्या कोविड १९ आजाराच्या प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी ओरोस फाटा येथे जमाव करून तसेच सत्कार समारंभासाठी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या जमाव केल्या प्रकरणी तुकाराम साईल, (पणदूर), श्रीपाद तवटे, (पवाशी), केशव नारकर ( नारुर), संतोष वालावलकर ( ओरोस), प्रभाकर सावंत (रानबांबुळी), देवेंद्र सामंत (वेताळ बांबर्डे), अंकुश जाधव (दोडामार्ग), अनंतराज पाटकर (हूमरमळा), अरविंद परब (आंबरड), विनायक आनवकर (आनव), नूतन आईर (तुळसुली), अमोल मालवणकर ( ओरोस), सुहास परब (ओरोस), नागेश परब (बाव), यांच्यावर भा. द. वि. १४३, १४९, १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (५), आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस संबधित संशयित हजर राहत नसल्याने न्यायालयाने पोलिसांना संबंधितांना न्यायायात हजर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या वेळी पोलिसांनी तुकाराम साईल, श्रीपाद तवटे, केशव नारकर, देवेंद्र सामंत, अंकुश जाधव, अनंतराज पाटकर, अरविंद परब, विनायक आनवकर, अमोल मालवणकर, सुहास परब, नागेश परब यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ ही जणांना ३० सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर माजी पंचायत समिती सभापती नूतन आईर यांची न्यायालयाने वैयक्तिक जात मुचलकत्यावर मुक्तता केली होती. उर्वरित ११ जणांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी होत सर्व जणांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here