Sindhudurg: खर्डेकर कॉलेज व स्वामिनी बचत गटातर्फे कांदळवनाची स्वच्छता

0
38
कांदळवनाची स्वच्छता
खर्डेकर कॉलेज व स्वामिनी बचत गटातर्फे कांदळवनाची स्वच्छता

वेंगुर्ला प्रतिनिधी –  “जी 20′ अंतर्गत उर्जा स्त्रोताचे संवर्धन व पर्यावरण पुरक जीवनशैली या कार्यक्रमानिमित्त बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सुमारे 50 ते 60 विद्याथ्र्यांनी, प्राध्यापकांनी तसेच स्वामिनी बचत गटाच्या सदस्यांनी मांडवी खाडी येथे कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विधानसभेचे-विरोधी-पक्ष/

विद्यार्थी व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनविषयी जागृती व्हावी यासाठी महाविद्यालयात प्रा.राजाराम चौगुले यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी सूर्य हा उर्जेचा स्त्रोत असून सोलार पॅनेल वापरुन सोलार उर्जेचे रुपांतर इलेक्ट्रीसिटीत केले जाते. सूर्य आपल्याला एक हजार पटीने जादा उर्जा देतो. त्याचा वापर होणे गरजेचे असल्याचे प्रा.चौगुले यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.वामन गावडे, डॉ.वसंतराव पाटोळे, प्रा.देविदास आरोलकर, डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.मारुती नवत्रे, प्रा.लक्ष्मण नैताम, प्रा.वैदही सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.  
फोटोओळी – कांदळवनाच्या स्वच्छतेनंतर कचरा एकत्र करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here