वेंगुर्ला प्रतिनिधी
जनता दलाचे प्रदेश सचिव पदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला परबवाडी येथील पत्रकार संजय परब यांची नियुक्ती केली ., तसेच त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ प्रभारी म्हणून नियुक्ती दिली आहे.
जनता दलात नुकताच पत्रकार संजय परब यांनी प्रवेश केला असून पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जिल्ह्याची विशेष जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे पत्रकार संजय परब यांनी आपले महानगर , सामना, महाराष्ट्र टाईम्स यासह अन्य वृत्त पत्रामध्ये विशेष संपादकीय जबाबदारी स्वीकारली आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न याना वाचा फोडली आहे त्यामुळे त्यांनी कोकणातील अनेक प्रलंबित प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविले जातील प्रसंगी लोकशाही मार्गाने आदोलने व उपोषण मार्ग अवलंबून सरकार दरबारी पाठपुरावा केला जाईल असे संजय परब यांनी सांगितले
फोटो ओळी
पत्रकार संजय परब याना जनता दल प्रदेश सचिव पत्र देताना जनता दल पक्षाचे प्रमुख पदाधीकारी

