Sindhudurg: जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत केळूस व संजिवनी ग्रामसंघ, केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0
57
आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -

केळूस– जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत केळूस व संजिवनी ग्रामसंघ, केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 08 मार्च 2023 रोजी सकाळी 9.00 ते 4.00 वा. यावेळेत आरोग्य उपकेंद्र केळूस येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटी-महामंडळाच्या-बसेस/

या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्री. योगेश शेटये यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने केळूस आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सपना सुनिल केळूसकर, खुडासवाडी येथे मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती शांती दत्ताराम साटम व आरोग्य तपासणी शिबिरासाठी आर्थिक सहकार्य करणारे श्री. विश्राम उर्फ भाई मोबारकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. तर हे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरासाठी विशेष सहकार्य करणारे डॉ. अमरेश होडावडेकर (यश क्लिनीक, केळूस), ओम मित्र औषधालयाचे श्री. मकरंद देसाई व सौ. मधुरा मकरंद देसाई, रवळनाथ मेडिकलचे श्री. प्रज्योत केळूसकर, सौ. महिमा मंगेश केळूसकर, प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे व आरोग्य उपकेंद्र केळूस यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये डोळे तपासाणी, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबीन व इतर सर्वसाधारण तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. हेमंत पावसकर यांनी केले. या निमित्ताने उपसरपंच श्री. संजिव प्रभू, ग्रामसेवक श्री. विवेक वजराटकर, डॉ. धनश्री हिरेमठ, डॉ. गोविलकर, डॉ. तेली, आरोग्य सहाय्यक श्री. मठकर, आरोग्य सेवक श्री. परब, ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. महेश नागवेकर, आबा वराडकर, सुभाष साटम, सुषम मसुरकर, रुचिरा प्रभुकेळूसकर, अक्षया केळूसकर, मानसी कुडव, दिप्ती मुणनकर, ग्रामसंघाचे पदाधिकारी निकिता मोबारकर, स्नेहल केळूसकर, आरती गोसावी, सुप्रिया मोबारकर, स्मिता राऊळ, रसिका केळूसकर याचबरोबर अंगणवाडी सेविका शांती साटम, संगिता केळूसकर, किरण रेवणकर, राजकिर्ती केरकर, नवभारत केळूस विद्यालयाच्या सौ. अनुप्रिया मयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. नारायण मोबारकर, बाळा मुणनकर, आरोग्य उपकेंद्र कर्मचारी सौ.अनिता गोसावी, प्राथमिक आरोग्य केंद्र परुळेचे कर्मचारी व केळूस गावातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here