कणकवली: महाराष्ट्र राज्यात विस्तारित असलेल्या दैनिक सिंधुदुर्ग समाचार वृतापत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून पत्रकार नियुक्ती केली जात असते. दैनिक सिंधुदुर्ग समाचार वृतापत्राच्या माध्यमातून स्वतःची पत्रकार म्हणून नवी ओळख निर्माण करण्याची अनेकांना संधी देण्यात येते. श्रीराम विठ्ठल कदम रा. मु. पो.नारुर,ता. कुडाळ,जि.सिंधुदुर्ग यांना दैनिक सिंधुदुर्ग समाचार,सिंधुदुर्ग वृत्तपत्राकडून जानेवारी २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी म्हणून ओळखपत्र देण्यात आलेले होते. परंतु त्यांची नियुक्ती ही केवळ सहा महिन्यांसाठी असून त्याची वैधता जून २०२० रोजी संपलेली आहे. याची जाहिरातदार ,वाचक,पत्रकार ,जिल्हा ग्रामपंचायत यांनी नोंद घ्यावी.श्रीराम कदम यांच्याकडे दैनिक सिंधुदुर्ग समाचार,सिंधुदुर्ग यांची बिलबुक लेटर हेड असून त्यांनी ते दैनिक सिंधुदुर्ग समाचार,सिंधुदुर्ग कार्यालयास सुपूर्द केलेले नाहीत.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गातील-उसक्षेत/
तरी कृपया श्रीराम विठ्ठल कदम यांच्याशी कोणताही व्यवहार करताना ते दैनिक सिंधुदुर्ग समाचार,सिंधुदुर्ग या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत याची नोंद घ्यावी.त्यांनीकेलेल्या गैरव्यवहाराशी दैनिक सिंधुदुर्ग समाचार,सिंधुदुर्गचा कोणताही कायदेशीर संबंध नाही असे जाहीर करत आहोत.


