वेंगुर्ला प्रतिनिधी- ओरोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे व शालेय मैदानी स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्जवल यश संपादन केले आहे.
कराटे स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या गटात आल्फिया रशिद शेख (३२ किलो खालील वजनी गट) हिने प्रथम क्रमांक तर ५२ किलो वजनी गटात जान्हवी नागेश वेंगुर्लेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. यांना क्रीडा शिक्षक व्ही.जी.वाले, आर.डी.केर्लेकर, कराटे प्रशिक्षक पुंडलिक हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर मैदानी स्पर्धेत मुलींच्या १४ वर्षाखालील वयोगटामध्ये १०० मी.धावणे व २०० मी. धावणे यात आर्या पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवित वेगवान धावपटूचा बहुमान पटकाविला. तसेच तिने ८० मी. हर्डल्समध्येही तृतीय क्रमांक, प्रदिप प्रजापती याने २०० मी.धावणेमध्ये द्वितीय क्रमांक तर रिलेमध्ये मुलांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या १७ वर्षाखालील गटामध्ये वंदना सावंत ८००० मी. धावणे प्रकारात प्रथम, तर १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात हातोडा फेक प्रकारात युवराज मस्के प्रथम क्रमांक व लक्ष्मण परब याने द्वितीय क्रमांक पटकाविला. यांना क्रीडा शिक्षक व्ही.जी.वाले, आर.डी.केर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुभाष-साबळे-डॉ-सर्वपल्ल/
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, पर्यवेक्षक आर.व्ही.थोरात यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – शालेय कराटे स्पर्धेतील विजेती आल्फिया शेख व जान्हवी वेंगुर्लेकर यांचे वेंगुर्ला हायस्कूलतर्फे अभिनंदन करण्यात आले.