Sindhudurg: जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार -जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते

0
50
१०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार

ओरोस: दिवाळीचा सण जवळ येऊ लागला आहे. सणासाठी केल्या जाणाऱ्या फराळाच्या साहित्याचीही घराघरात जमवाजमव सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत एकुण 1 लाख 63 हजार 12 शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त एक शिधाजिन्नस संच देण्यात येणार आहे.यामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असणार आहे. या एका शिधाजिन्नस संचाचे सार्वजनिक वितरण प्रति संच रुपये 100 असून ते ई पास प्रणालीव्दारे वितरीत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांनी सदर शिधाजिन्नसांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, यांनी केले आहे. ज्या कुटुंबांना शासनाकडून रुपये 3 प्रतिकिलो तांदुळ व रुपये 2 प्रिती किलो गहू या दराने अन्नधान्य अनुज्ञये आहे. त्या सर्व शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 4 शिधाजिन्नसांचे वितरण करण्यात येणार आहे.त्यामुळे शिधापत्रिका संगणकिकृत व आधार सिडेड असणे आवश्यक आहे.

यासाठी शिधापत्रिकाधारकांनी संबंधित तहसिलदार कार्यालाच्या पुरवठा शाखेशी संपर्क साधावा अथवा करुन त्यांचा आधार क्रमांक संगणक प्रणालीत तातडीने अद्ययावत करुन घ्यावा. पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस संच प्राप्त न झाल्यास तालुका पुरवठा निरिक्षक सावंतवाडी- 9421261729, दोडामार्ग 9420271769, वेंगुर्ला 9421238498, कुडाळ 7057012255,कणकवली 9960535800.मालवण-9552142889,देवगड 8329426393, वैभववाडी 8830303509 या क्रमांकावर संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here