Sindhudurg: जेष्ठ शिवसेना नेते कै.जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत वर्षा वॉरियर देवबाग संघ विजेता तर रॉयल मालवणी संघ उपविजेता

0
162
मसुरा प्रिमिअर लीग भगवा चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मसुरा प्रिमिअर लीग भगवा चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण;कै.जयवंत परब यांचे शिवसेना पक्षासाठी मोठे योगदान – आ. वैभव नाईक

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

जेष्ठ शिवसेना नेते कै. जयवंत परब यांच्या स्मरणार्थ मसुरे शिवसेनेच्या वतीने मसुरा प्रिमिअर लीग भगवा चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वर्षा वरिअर्स देवबाग संघ विजेता ठरला तर रॉयल मालवणी संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मास्टर-ब्लास्टर-सचिन-ते/

आ. वैभव नाईक म्हणाले, कै. जयवंत परब यांनी शिवसेना पक्षवाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने पक्षात पोकळी निर्माण झाली.मसुरे येथील शिवसैनिकांनी त्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.मसुरे ग्रामस्थांनी शिवसेनेवर विश्वास दाखविल्याने मसुरे ग्रामपंचायत शिवसेनेकडे आल्यानंतर अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. येत्या काळातही उर्वरित विकास कामे मार्गी लावली जातील असे आमदार वैभव नाईक यांनी आश्वासित केले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,छोटु ठाकुर,मर्डे सरपंच संदीप हडकर,विभाग प्रमुख व उपसरपंच राजेश गांवकर, राजा कोरगांवकर,शिवाजी परब,सचिन पाटकर,राघवेंद्र मुळिक,जगदीश चव्हाण,पंढरीनाथ मसुरकर,अनिल मेस्त्री आदींसह शिवसेना पदाधिकारी व मसुरे येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here