वेंगुर्ला प्रतिनिधी- ज्येष्ठ नागरीक संघ, वेंगुर्लेचा वर्धापनदिन २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायलायाचे सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. २०१९ साली संघाचे सचिव रघुनाथ परब यांना झालेल्या अपघातामुळे व त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे संघाचा वर्धापनदिन होऊ शकला नव्हता. यावर्षी झालेल्या या वर्धापनदिनात सुमारे १०० स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अज्ञात-गाडी-चालकाकडून-व/
या कार्यक्रमाप्रसंगी ७५ वर्षे झालेल्या सदस्यांचा सत्कार अध्यक्ष रा.पां.जोशी यांच्या हस्ते तर वैवाहिक जीवनाला ५० वर्षे झालेल्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार रेश्मा पिगुळकर व रमेश पिगुळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यात पुरुषांना स्मृतिचिन्ह व श्रीफळ तर स्त्रीयांना सौभाग्यवाण देण्यात आले. पुणे येथील शारदा ज्ञानपिठम् तर्फे रा.पां.जोशी यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानिमित्त सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या हस्त त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री.रायरीकर यांनी ज्येष्ठांना मिळणा-या विविध सोयी सवलतीबाबत माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री.नाईक, श्री.कांबळी व श्री.पिगुळकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला संघाचे उपाध्यक्ष शामराव काळे, कार्यवाह तिरपुडे, घोगळे, दाभोलकर, बांदवलकर, येरागी, कडुलकर उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सायली-गावडे-खूनप्रकरणी/
फोटोओळी – सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्या हस्ते रा.पां.जोशी यांचा सत्कार करण्यात आला

