Sindhudurg: तिलोत्तमा सावंत मृत्यू आकस्मिक नसून तो खून झाल्याचा संशय

0
18
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनिय
रायगड जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई

चौकट- ही घटना ३ वर्षापूर्वी घडली होती. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. दरम्यान संशयित आरोपी सुधीर ऊर्फ बाबल्या बाळू गावडे याने तिलोत्तमा यांचा खून केल्याचे कोणतेही पुरावे अद्यापपर्यंत नाहीत. कोर्टाच्या आदेशानुसार याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.

वेंगुर्ला प्रतिनिधी-

मठ येथील तिलोत्तमा सावंत यांचा मृत्यू हा आकस्मिक झाला नसून तो खून असल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीने तपास करण्याचे आदेश वेंगुर्ला न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. अखेर न्यायालयीन आदेशानुसार पोलिसांनी संशयित आरोपी सुधीर ऊर्फ बाबल्या बाळू गावडे (रा.चौकुळ, सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अॅड. मनीष सातार्डेकर आणि अॅड. सागर ठाकुर यांनी युक्तिवाद केला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिक्षक-भरती-उमेदवारांस/

मठ-कोल्ह्याचे भाटले येथील तिलोत्तमा सावंत या आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांचे तीन मुलगे कामानिमित्त मुंबईला राहत असत. १ ऑगस्ट २०१९ रोजी तिलोत्तमा यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. तिलोत्तमा यांचा मृत्यू होण्यापूर्वी दोन दिवस आधी सुधीर गावडे हा त्यांचा एक दूरचा नातेवाईक त्यांच्या घरी येऊन राहिला होता. याबाबत त्याने तिलोत्तमा यांच्या तीन पैकी एकाही मुलाला कोणतीच कल्पना दिलेली नव्हती. मात्र १४ ते १५ वर्षांनंतर अचानक येऊन राहिलेल्या सुधीर याचे वागणे संशयास्पद वाटत असल्याची माहिती तिलोत्तमा यांनी मुंबईस्थित अनंत, श्रीकृष्ण आणि संदीप या आपल्या तीनही मुलांना दिली होती. आईचा मृत्यू झाल्यानंतर घरी दाखल झालेल्या मुलांना तिच्या अंगावर मारहाणीच्या खूणा असल्याचे आढळून आले होते. तिलोत्तमा यांच्या गळ्यावर नखांचे ओरखडे होते. तर गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची माळ व पैसे असलेली उशी चोरीला गेल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे आपल्या आईचा सोने व पैशांसाठी खून झाला असल्याची तक्रार अनंत यशवंत सावंत यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांकडे केली होती. त्यांनी योग्य ती दखल न घेतल्याची नाराजी व्यक्त करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडूनही न्याय न मिळाल्याची तक्रार करीत वेंगुर्ला न्यायालयात संशयितावर गुन्हा दाखल होण्याबाबतचा अर्ज दाखल केला गेला होता. या प्रकरणी वेंगुर्ला न्यायालयात झालेल्या सुनावणीत फिर्यादीच्या वकिलांनी केलेला. युक्तिवाद ग्राह्य मानून तिलोत्तमा यांचा मृत्यू आकस्मिक नसून खून झाल्याचा संशय निर्माण होत असल्याचे मत व्यक्त करीत न्यायाधीश के.के.पाटील यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here