कर भरा आणि पुढील कारवाई टाळा!
वेंगुर्ला प्रतिनिधी- थकित मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने जप्ती पथकाबरोबरच शहरातील चौकाचौकात थकबाकीदारांची नावे फलकाच्या माध्यमातून लावण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सामुहिक-कॉपीसाठी-टाकळी/
आर्थिक वर्ष संपत असतानाच नगरपरिषदेकडून मालमत्ता व पाणीपट्टी करांच्या वसुलीसाठी जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. कर वसुलीसाठी ४ जप्ती पथकांची निर्मिती केली असून त्याद्वारे कारवाई सुरु करण्यात आली आहे. एका जप्ती पथकात २ याप्रमाणे ८ कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत ६ मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली. त्यातील ३ जणांनी कर भरला आहे. जास्तीत जास्त कर वसुली करणे हे नगरपरिषदेचे उद्दिष्ट आहे. यासाठी जे कर भरणार नाहीत अशा थकबाकीदारांचे नावे जाहीर करण्यात येणार आहे. तसेच त्या थकबाकीदारांची नावे फलकाच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या चौकाचौकात लावले जाणार आहेत. तरी अशाप्रकारची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी त्वरित भरावी असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे केले आहे. कर वसुलीच्या प्रमाणात पुढीलवषी्र शासनाकडून अनुदान मिळणार असल्याने यावर्षी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत वसुलीवर विशेष भर दिला आहे.