Sindhudurg: थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास व्याज रकमेत ५० टक्के सवलत!

0
36

ओरोस: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्यामार्फत एकरकमी कर्ज परतावा योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालवधी संपलेल्या लाभार्थीसाठी महामंडळाकडून योजना राबविण्यात येत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-सामान्य-नागर/

या योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या मदुती कर्ज, बील भांडवल कर्ज, थेट कर्ज, या सर्व योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे अशी जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली आहे. तरी संबधित सर्व कर्ज खातेधारकांना कळविण्यात येते की, सदर योजना माहे मार्च २०२३ पर्यंतच असून या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे.

लाभार्थीने कर्ज खाते बंद केल्यावर महामंडळाच्या रुपये १०.०० लक्ष कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत विविध महामंडळाच्य योजनांचा लाभ घेता येईल असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८१५६ विजय पाटील मो.९०११२४२०३६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here