Sindhudurg: दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांनी कागदपत्रे अद्ययावत करण्याचे आवाहन

0
65
राज्यातील हजारो शिक्षकांचे आधार कार्ड ठरले अवैध!आता पुढे काय होणार?
राज्यातील हजारो शिक्षकांचे आधार कार्ड ठरले अवैध!आता पुढे काय होणार?

ओरोस : दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांनी, आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे, असे आवाहन प्र.निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे. केंद्र शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधार कार्ड नोंदणीची मोहीम राबवण्यात येऊन बहुतांश नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आली आहेत.

तसेच आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील या दहा वर्षाच्या कालावधीत एकही आधार कार्डचा कोठेही वापर केला नसेल अशा व्यक्तीने ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे अपडेट करुन घ्यावी. त्यामूळे आधार मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील. https://sindhudurgsamachar.in/महत्वाचे-जुन्या-वाहनांच/

आधार कार्ड अपडेट कुठे कराल?

आधार कार्ड ऑफलाईन किंवा ऑनलाईन अपडेट करु शकता ‘माय आधार’ पोर्टल वर जाऊन माहिती अपडेट करता येऊ शकते. तसेच जवळच्या आधार सेंटरवर जाऊन माहिती अपडेट करु शकतात.

कोणती कागदपत्रे आश्यक आधार कार्ड धारकांच्या पत्ता बदल करायचा असेल तर त्यांचा पुरावा आधार कार्ड अपडेट करताना द्यावा लागणार आहे. मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळेचा प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. नवीन आधार कार्डसाठी जन्म दाखला, गुणपत्रिका, ओळख पुरावा, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here