Sindhudurg: दांडी रॅम्पकडे जाणाऱ्या काँक्रीट जोडरस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

0
153
दांडी रॅम्पकडे जाणाऱ्या काँक्रीट जोडरस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून ९ लाखाचा निधी मंजूर

प्रतिनिधी -पांडुशेठ साठम

मालवण – मालवण तालुक्यातील दांडी (निशिकांत घर ते समुद्र किनाऱ्याकडील) रॅम्पकडे जाणारा काँक्रीटचा जोडरस्ता करणे या कामासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन मधून ९ लाख रु.निधी मंजूर करून घेतला आहे. आज आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. माजी आरोग्य सभापती, माजी नगरसेवक पंकज सादये, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक,माजी नगरसेविका सेजल परब यांनी या कामासाठी आ. वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पत्रकार-वारीसेंच्या-मृत/

दरम्यान यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दांडी येथील रामेश्वर सोसायटीला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी अध्यक्ष जगदीश खराडे, उपाध्यक्ष हेमंत जोशी यांनी आ. वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच डिझेल परताव्याची रक्कम मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी आ.वैभव नाईक यांनीही मच्छीमार व सोसायट्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक पंकज सादये, माजी नगरसेविका सेजल परब,शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,अन्वय प्रभू, मनोज मोंडकर, उमेश मांजरेकर, भाई कासवकर,तपस्वी मयेकर,नरेश हुले,बाबू वाघ,जगदीश खराडे,सुशांत शेलटकर,परेश वाघ, नरेश कोयंडे,राजेश हुले,दुमिंग फर्नांडीस,विशाल आचरेकर,रवी कोयंडे,गणपत गांवकर, मिकी डिसोझा, इशा गांवकर,रवी पारकर, संतोष वायंगणकर,दादू परब,लुईस फर्नांडीस,विष्णू मालंडकर,किरण कोयंडे,राजा शंकरदास,अमित खरात,आनंद परब, बबलू मोंडकर,नामदेव केळुस्कर,यशवंत गावकर,सिद्धेश मांजरेकर,दिलीप घारे,सोयायटी सचिव सतेजा,मंगेश धुरी, किशोर बांधकर आदी शिवसैनिक व दांडीवासीय उपस्थित होते.

         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here