Sindhudurg: दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

0
44
दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश
दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेना उद्धव ठाकरे गटास धक्का

वेंगुर्ला प्रतिनिधी- दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वेंगुर्ल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटात जोरदार धक्का बसला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्हास्तर-शालेय-विविध/

 महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी कार्यालयात दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच फिल्सुअनिता फर्नांडिस यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य सिसीलिया मास्करेनासएकनाथ राऊत नरेश बोवलेकरतमास डीसोझा व जॉन मेंडोसामाजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकरजिल्हा संघटक सचिन वालावलकरमाजी पंचायत समिती सभापती सुनील मोरजकरकोचरा सरपंच योगेश तेलीशिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवीमहिला जिल्हाप्रमुख अॅड.नीता सावंतअनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.

 दाभोली ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावाच्या पर्यटन वाढीसाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन दाभोलीचा विकास केला जाईल असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले. सर्वांचे स्वागत सचिन वालावलकर यांनी केले तर आभार नितीन मांजरेकर यांनी मानले.

फोटोओळी – शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दाभोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सदस्यांचे दीपक केसरकर यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here