Sindhudurg: देवगड तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री अरुण भाई दुधवडकर च्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

1
196
शिवसेना जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री अरुण भाई दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

देवगड – देवगड तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री अरुण भाई दुधवडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली – या बैठकीला जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते व युवासेना जिल्हाप्रमुख श्री सुशांत नाईक उपस्थित होते

सदर उपस्थित पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांचे संघटने विषयी मत जाणून घेऊन प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच संघटनेत काम करत असताना ज्या अडचणी येतात त्यामुळे संघटना वाढीसाठी जो पदाधिकाऱ्यांना त्रास होतो त्याविषयी सुद्धा सविस्तर चर्चा करून त्यावर महत्त्वाचा असा तोडगा काढण्याचा बैठकीत ठरविण्यात आले तसेच विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा करून त्यामार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पदाधिकारी यांनी केली.

यावेळी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना उपनेते श्री अरुण भाई यांनी सर्वांच्या प्रश्नावर अनमोल असे मार्गदर्शन करुन सर्व शंकांचे निरसन केले व भविष्यात संघटना अधिक मजबूत होण्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून जोमाने काम करूया असे आवाहन करून विकास कामांसाठी खासदार श्री विनायक राऊत साहेब यांच्या माध्यमातून पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडुन निधी उपलब्ध करून कामे मार्गी लागतील तेव्हा जे गेले त्यांच्यासाठी रडत बसू नका आपली ताकद दाखवून देऊया आणि इथल्या आमदाराला घरी बसवूया असे मत दुधवडकर साहेबांनी व्यक्त केले तसेच संघटनेत जे काही बदल करायचे आहेत त्याविषयी आपण पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन देऊन कोणीही अपयशाला खचून न जाता सर्वांनी संघटनेचे काम जोमाने करा असे आवाहन केले.

1 COMMENT

  1. […] आणि अधिकाऱ्यांना दिला होता. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-देवगड-तालुका-कार्यकार… युवासेनेच्या आंदोलनाच्या […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here