Sindhudurg: दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरती

0
74
दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरती

दोडामार्ग -दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारानी अर्ज सादर करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी तारका बाळाजी साटम यांनी केले आहे. सदर पद भरतीसाठी अर्ज दिनांक 27 फेब्रुवारी पर्यंत करता येणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कणकवलीत-विश्वकर्मा-मित/

सदर अर्ज सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दोडामार्ग कार्यालय यांजकडे स्विकारण्यात येणार आहेत. अधीक माहितीसाठी संबंधित सरपंच, गामपंपचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय दोडामार्ग 02363-256506,9421029556 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदाची माहीती पुढीलप्रमाणे आहे.

परमे ग्रामपंचायत – पणतुर्ली, महसूल गावाचे नाव, परमे, अंगणवाडी केंद्राची नाव परमे गावठण, रिक्त पद अंगणवाडी सेविका माधन 8 हजार 325.

परमे पणतुर्ली ग्रामपंचायत– महसूल गावाचे नाव पणतुर्ली, अंगणवाडी केंद्राची नाव परमे पणतुर्ली, रिक्त पद अंगणवाडी सेविका, मानधन 8 हजार 325.

कुडासे ग्रामपंचायत – महसूल गावाचे नाव कुडासे,अंगणवाडी केंद्राचे नाव कुडासे गावठण, रिक्त पद अंगणवाडी मदतनीस, मानधन 4 हजार 425.

झरेबांबर ग्रामपंचायत – आंबेली,महसूल गावाचे नाव झरेबांबर,अंगणवाडी केंद्राचे नाव झरेबांबर काजुळवाडी,रिक्त पद अंगणवाडी मदतनीस,मानधन 4 हजार 425.

तळेखोल ग्रामपंचायत– महसूल गावाचे नाव तळेखोल,अंगणवाडी केंद्राचे नाव तळेखोल वाटूळवाडी, रिक्त पद अंगणवाडी मदतनीस,मानधन 4 हजार 425.

कोनाळ ग्रामपंचायत – महसूल गावाचे नाव कोनाळ, अंगणवाडी केंद्राचे नाव कोनाळ मुख्यवसाहत, रिक्त पद अंगणवाडी मदतनीस, मानधन,4 हजार 425.

तळकट ग्रामपंचायत – महसूल गावाचे नाव तळकट, अंगणवाडी केंद्राचे नाव तळकट कट्टावाडी, रिक्त पद अंगणवाडी मदतनीस, मानधन 4 हजार 425.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here