प्रभागसंघास लागेल ते सहकार्य करू-आ. वैभव नाईक
प्रतिनिधी-पांडुशेठ साठम
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत संगम प्रभागसंघ नेरूर देऊळवाडा यांच्या वतीने संगम प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व इतर कार्यक्रम आज सुखकर्ता हॉल नेरूर चव्हाटा येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. ग्रामसंघ व सीआरपींचा सत्कार कऱण्यात आला. हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-महिंद्रा-लास्ट/
याप्रसंगी आ. वैभव नाईक म्हणाले, प्रभागसंघ नेरुरच्या माध्यमातून अत्यंत चांगले कार्य सुरु आहे. त्यामुळेच वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठया संख्येने गर्दी झाली. महिलांना व्यासपीठ मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण जे जे उपक्रम घ्याल त्यासाठी एक भाऊ म्हणून आपल्या पाठीशी उभा राहीन.आपण उत्पादन घेतलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर,नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, प्रभागसंघ अध्यक्ष सोनाली चव्हाण, प्रभागसंघ सचिव स्वरा नेरुरकर, प्रभागसंघ समन्वयक प्राजक्ता नाईक-धुरी, प्रभाग संघ समन्वयक प्रभू, प्रभागसंघ कोषाध्यक्ष पुष्पलता म्हाडदळकर आदींसह नेरूर जिल्हा परिषद मतदार संघातील सरपंच,प्रभागसंघ कार्यकारिणी मंडळ,लेखापाल, सर्व सीआरपी व बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
[…] […]