प्रतिनिधी- पांडूशेठ साठम
मालवण-देवबाग समुद्र किनारी झालेल्या नौकेच्या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (वय ५५) हे मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. काल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी श्री.राऊळ यांच्या घरी भेट देत विचारपूस करत कुटूंबियांना धीर दिला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,बाबी जोगी,सन्मेष परब, किरण वाळके, मोरेश्वर धुरी, अनिल केळुस्कर आदी उपस्थित होते.
मच्छीमारी करून किनाऱ्यावर परतत असताना समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात 'मोरेश्वर कृपा' नौका उलटली. सोमवारी सकाळी मालवण-देवबाग समुद्र किनारी ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (वय ५५) हे मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.