Sindhudurg: पाटकर हायस्कूलच्या दोन मुलींना विद्या शिष्यवृत्ती

0
31
पाटकर हायस्कूलच्या दोन मुलींना विद्या शिष्यवृत्ती

वेंगुर्ला प्रतिनिधी- कॅनरा बँक सन २०१३पासून मुलींसाठी कॅनरा बँक विद्या शिष्यवृत्ती देत आहेत. सन २०२२-२३ मध्ये तालुक्यातील पाचवी ते दहावीमधील  एकूण सहा विद्यार्थीनींना देण्यात आली. यात पाटकर हायस्कूलमधील इयत्ता दहावीतील कु. भावना मोचेमाडकर व इयत्ता नववीमधील कु. तन्वी खानोलकर यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

 कॅनरा बँकेने शिष्यवृत्तीसाठी पाटकर हायस्कूलमधील मुलींची निवड केल्याबद्दल बँकेचे वेंगुर्ला शाखाधिकारी धनराज आंबेतकर यांच्यासह बँक कर्मचा-यांचे आभार मानले. तर ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी पाटकर हायस्कूलचे शिक्षक महेश बोवलेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो – भावना मोचेमाडकरतन्वी खानोलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here