वेंगुर्ला प्रतिनिधी – हंगामाच्यावेळी पेट्रोल आणि सीएनजीचा तुटवडा भासू न देता तो अखंडपणे चालू ठेऊन रिक्षा व्यावसायीकांना सहकार्य केल्याबद्दल वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे वेंगुर्ला-भटवाडी येथील वरसकर पेट्रोल पंपाचे संचालक विजय वरसकर यांचा व सर्व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.
मे महिना आणि गणेश चतुर्थी हा कालावधीत रिक्षा व्यावसायीकांसाठी प्रवासी भाड्याच्यादृष्टीने महत्त्वाचा असतो. अशावेळी पेट्रोल आणि सीएनजीचा पुरवठा खंडित झाल्यास रिक्षा व्यावसायीकांना त्याचा फटका बसतो. मात्र, भटवाडी येथील वरसकर यांनी योग्य नियोजन केल्यामुळे पेट्रोन आणि सीनएजीचा तुटवडा भासला नाही. तसेच रिक्षा व्यावसायीकांनाही दिवसरात्र चांगल्याप्रकारे सेवा दिली. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे पेट्रोल पंपाचे संचालक विजय वरसकर यांचा व सर्व कर्मचा-यांचा त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ यांच्यासह बहुसंख्य रिक्षाचालक-मालक उपस्थित होते.
फोटोओळी – हंगामाच्यावेळी इंधन तुटवडा भासू न देता पेट्रोल पंप अखंड सुरु ठेवल्याबद्दल आणि चांगली सेवा दिल्याबद्दल वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे पेट्रोल पंप संचालक व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

