Sindhudurg: बाह्य कार्याचेही शिक्षण विद्यार्थ्यांना द्या!- शेखर सामंत

0
32

वेंगुर्ला प्रतिनिधी-आपल्या तत्त्वांपासून न ढळता व्रतस्थपणे पुरस्कार देण्यासाठी योग्य शिक्षक व शाळा निवडून मागील ४० वर्षे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणारी नगर वाचनालय वेंगुर्ला ही जिल्ह्यातील अग्रेसर संस्था आहे. शिक्षकांनी चार भिती पलिकडचे सर्वच विषयांचे शिक्षण देतानाच बाह्य कार्याचेही शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. यासाठी गुणात्मक कार्याने शैक्षणिक गुणवत्तेसह आदर्श शाळा घडल्या पाहिजे असे प्रतिपादन पुरस्कार वितरण प्रसंगी पत्रकार शेखर सामंत यांनी केले.

वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे जाहिर झालेल्या पुरस्कारांचे वितरण २ ऑक्टोबर रोजी नगरवाचनालयाच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात पार पडले. यात मातोंड-वरचे बांबर शाळेचे शिक्षक सुभाष साबळे यांना जे.एम.गाडेकर यांनी दिलेल्या देणगीतून मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, वेंगुर्ला शाळा नं.१च्या शिक्षिका गायत्री बागायतकर यांना  कै.जानकीबाई मे.गाडेकर स्मरणार्थ आदर्श शिक्षिका पुरस्कार तर अणसूर-पाल हायस्कूलच्या शैलजा वेटे यांना अनिल श्रीकृष्ण सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती माध्यमिक विभागासाठीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच जिल्हा परिषद नवभारत विद्यालय केळुस नं.१ या शाळेस रामकृष्ण पांडुरंग जोशी यांच्या देणगीतून देण्यात येणा-या सौ.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सायली-गावडे-खूनप्रकरणी/

या कार्यक्रमात बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परुळेकर यांनी महात्मा गांधींनी म्हटलेल्या ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे‘ याचा उल्लेख करुन शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचा आदर करणारा त्यहूनही श्रेष्ठ आहे. मुलांना सर्वच क्षेत्रात घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असल्याचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर म्हणाले. प्रास्ताविका कैवल्य पवार यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे अशाप्रकारच्या आदर्श पुरस्कारांचे वितरण केले जात असल्याची माहिती दिली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अज्ञात-गाडी-चालकाकडून-व/

कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.महेश बोवलेकर यांनी पुरस्कारधारकांच्या कार्याचा आढावा वाचून त्यांचा परिचय करुन दिला. तर पुरस्कारधारकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्थेचे कार्योपाध्यक्ष सदानंद बांदेकर, उपकार्यवाह माया परब, सदस्य नंदन वेंगुर्लेकर, मंगल परुळेकर, दीपराज बिजितकर, केळुस शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, अणसूर पाल हायस्कूलचे माजी मुख्याध्याकप एम.जी.मातोंडकर, किरण वेटे, पाटकर हायस्कूलच्या शिक्षिका सविता जाधव, मेहंदी बोवलेकर, भाऊ करंगुटकर, वाचक अजित राऊळ, चांदेरकर उपस्थित होते. नंदन वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आंतरमहाविद्यालयीन-क्र/

फोटोओळी – नगरवाचनालयाच्या पुरस्कार प्रदानवेळी पुरस्कारप्राप्त व्यक्तीमान्यवर व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here