Sindhudurg: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या कार्यक्रमाअंतर्गत कायद्याची माहिती पुस्तिका सर्व शासकीय रुग्णालयात ठेवण्याच्या सूचना

0
23
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या कार्यक्रमाअंतर्गत कायद्याची माहिती पुस्तिका सर्व शासकीय रुग्णालयात ठेवण्याच्या सूचना

ओरोस: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या कार्यक्रमाअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती पुस्तिका सर्व शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली.

पीसीपीएनडीटी जिल्हास्तर पथकाची बैठक आज झाली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. सई धुरी, स.पो.नी. के.डी. शिरदावडे, डॉ. एस.आर. चौगुले, डॉ. डी.व्ही. करंबळेकर, डॉ. यु.आर. एैवळे आदी उपस्थित होते. विधी सल्लागार दिमाख धुरी यांनी सुरुवातीला विषय वाचन करुन माहिती दिली.

जिल्ह्यातील एकूण 70 सोनोग्राफी केंद्रे व 29 गर्भपात केद्रांची तपासणी वैद्यकीय अधीक्षकामार्फत 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याचा भंग केल्याचे निदर्शनास आलेले नाही. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाअंतर्गत पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती पुस्तिका महिला दिनानिमित्त प्रकाशित करुन अंगणवाडी, सोनोग्राफी केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व शाळांमध्ये वितरित करण्‍यात आली आहे. यावर या पुस्तिका सर्व शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे श्री. सोनोने म्हणाले. जिल्ह्यामध्ये मागील वर्षी एक चालू वर्षी दोन स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी यावेळी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here