Sindhudurg: भगवती आंब्रड प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला आ. वैभव नाईक यांनी दर्शविली उपस्थिती

0
34
क्रिकेट, वैभव नाईक,
भगवती आंब्रड प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला आ. वैभव नाईक यांनी दर्शविली उपस्थित

वृत्वि इलेव्हन आंब्रड संघ प्रथम तर ब्राम्हणदेव सुकळवाड संघ द्वितीय

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

भगवती आंब्रड प्रीमिअर लीग २०२३ प्रकाश झोतातील डे- नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २९ व ३० एप्रील २०२३ रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाली. जिल्ह्यातील २० नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी स्पर्धेला उपस्थिती दर्शवत रोमहर्षक सामन्यांचा आनंद घेतला. त्यांच्या हस्ते सामन्याची नाणेफेक करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurrg-आ-वैभव-नाईक-यांच्या-पाठप/

या स्पर्धेत वृत्वि इलेव्हन आंब्रड संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक ब्राम्हणदेव सुकळवाड संघाने मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच इतरही वैयक्तिक बक्षिसेही देण्यात आली.

यावेळी शिवसेना विभागप्रमुख विकास राऊळ, सरपंच मानसी कदम, उपसरपंच विठ्ठल तेली,ग्रा.प. सदस्य सागर वाळके,स्वप्नील मुंज, अरविंद मुंज, रुपेश लाड,माजी ग्रा.प.सदस्य अमेय राऊळ,टिपू सावंत, हर्षल मुंज, वितीन भोगटे, सीताराम दळवी, जितेंद्र मुंज, जयेश मसुरकर, राजेश तेली, विजय दळवी,प्रवीण राऊळ, गौरव काणेकर,तुषार सकपाळ आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व आंब्रड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here