वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने माजी खासदार व भाजपा सरचिटणिस निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी घेतलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड वाटप शिबिराचा १५० दिव्यांगांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे जयपूर फूट बसविण्यात आलेल्या अनामिका शिरोडकर व मनिषा रेवणकर या दिव्यांगांच्या हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आ-वैभव-नाईक-यांच्या-माध्/
ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्था आयोजित दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड शिबिरावेळी प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, साईप्रसाद नाईक, प्रशांत खानोलकर, मनवेल फर्नांडिस, खरेदी विक्री संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, बाळा सावंत, कमलेश गावडे, विजय रेडकर, सायमन आल्मेडा, पपू परब, तृषार साळगावकर, शरद मेस्त्री, रमेश नार्वेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, शितल अंगचेकर, कृपा मोंडकर, सारिका काळसेकर, आकांक्षा परब, अंकीता देसाई, अण्णा गवंडे, मानसी परब, सत्यविजय गावडे, दाजी परब, कावेरी गावडे, बिटू गावडे, समिर कुडाळकर, प्रणव वायंगणकर, पुंडलिक हळदणकर, नितीन परब, धर्मराज कांबळी, डॉ. पवार मॅडम, शैलेश जामदार साईकृपा अपंगशक्ती संस्थेचे शामसुंदर लोट, भरत परब, प्रशांत केळुसकर उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयाचे नेत्रशल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप भगत, डॉ.रूपाली पाटील, डॉ.शाम राणे, फिजिओथेरेपिस्ट दिपा पिरणकर, मनोविकृती समोदेशक रेश्मा भाईप, स्पिचथेरीपीस्ट श्रीधर पोवार, नेत्रचिकीत्सा अधिकारी एम.एस.माकार, पुनम गावडे यांनी तपासणी केली.
फोटोओळी – दीव्यांग आघाडी व भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला.