वेंगुर्ला प्रतिनिधी- भारतीय बौद्ध महासभा सिधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात गायत्री जोशी तर मोठ्या गटात संस्कृती हरकुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिधुदुर्गच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. उद्घाटन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अॅड.सत्यवान चेंदवणकर, धम्मीपिठाचे संस्कार विभाग उपाध्यक्ष राघोजी चेंदवणकर, महिला विभाग उपाध्यक्षा सुषमा हरकुळकर, संरक्षण विभाग उपाध्यक्ष अशोक कदम, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विदिशा जाधव, सचिव राकेश वराडकर, तालुका कोषाध्यक्ष रामचंद्र जाधव, केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtr-अवकाळी-पावसाने-
स्पर्धेत लहान गटामध्ये गायत्री जोशी (पाट), विनित परब (कुडाळ), दिक्षिता मातोंडकर (मातोंड) तर मोठ्या गटात संस्कृती हरकुळकर (कणकवली), श्रद्धा नेमण (मातोंड), श्रावणी धुरी (मठ) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. लहान गटाचे परिक्षण सुंदर म्हापणकर व सीमा मराठे यांनी तर मोठ्या गटाचे परिक्षण प्रा.नंदगिरीकर व वीरधवल परब यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संचिता जाधव, अनिकेत कांबळे, अनिल जाधव, सुनिल जाधव यांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी – विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांच्या स्वागत करण्यात आले.


