Sindhudurg: भास्कर जाधवांचा निषेध असो अशा घोषणा देत लांजा तालुका भाजपा पदाधिकार्‍यांच्या वतीने जाहिर निषेध

0
16

लांजा (प्रतिनिधी) अभिमन्यू वेंगुर्लेकर

“निषेध असो निषेध असो, लंगड्या भास्कर जाधवांचा निषेध असो” अशा घोषणा देत लांजा तालुका भाजपा पदाधिकार्‍यांच्या वतीने गुरुवारी ६ ऑक्टोबर रोजी शहरात गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या फोटोला जोडे मारून व त्यांचा फोटो जाळण्यात आला.
बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून लांजा तालुका भाजपाच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांच्या फोटोला चपला मारून आणि त्यांचा फोटो जाळून जोरदार निषेध करण्यात आला. राणे साहेब अंगार है, बाकी सब भंगार है अशा घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला .https://sindhudurgsamachar.in/maharashtra-वंदे-भारत-एक्सप्रेसला-अ/
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश खामकर, शहर अध्यक्ष प्रमोद कुरूप, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, इक्बाल गिरकर तसेच नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, पदाधिकारी विराज हरमले, अजय गुरव, चंद्रकांत मांडवकर, बाबा लांजेकर, बावा राणे, सुयोग तोडकरी, शेखर सावंत आदींसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here