वेंगुर्ला प्रतिनिधी – मठ येथील श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा शुक्रवार दि. २८ एप्रिल ते बुधवार दि.३ मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रेयांश-कोळसुलकर-तालुक्/
२८ रोजी धार्मिक कार्यक्रम, सायं.७ वा.भजन, ८ वा. बोवलेकर कॅश्यू पुरस्कृत हरिहर नातू यांचे ‘शुंभ व निशुभ वध‘ यावर कीर्तन, २९ रोजी धार्मिक कार्यक्रम, सायं.७ वा. भजन, ८ वा. सुभाष ठाकूर पुरस्कृत प्रशांत धोंड यांचे ‘पार्वतीचे सदन‘यावर कीर्तन, ३० रोजी सायं.७ वा. मिलिद पुरस्कृत सदाशिव पाटील यांचे ‘कामाक्षी महात्म्य‘ यावर कीर्तन, ९ वा. अनिल ठाकूर पुरस्कृत सिद्धेश्वर महिला मंडळ, खानोली यांचे कीर्तन, १ मे रोजी सायं.७ वा. भजन, ८ वा. महेश सीताराम बोवलेकर पुरस्कृत दत्तात्रय उपाध्ये यांचे ‘रुक्मिणी स्वयंवर‘ या आख्यानावर कीर्तन, २ मे रोजी सकाळी स्थलप्राकारशुद्धी, शिखर कलश स्थापनांगभूत हवन, दुपारी १२.२३ वा. जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर येथील महंत मठाधीपती यांच्या हस्ते शिखरकलश पूजा व कलशारोहण, सायं. ७ वा. डॉ.सुदिश सावत पुरस्कृत स्नेहलदीप सामंत यांचे ‘सुवर्णतुला‘ यावर कीर्तन, ९ वा. अनिल ठाकूर पुरस्कृत ब्राह्मण प्रासादिक मंडळाचे भजन, दि. ३ रोजी सकाळी १०.२३ वा. श्रीदेवी सातेरी व परिवार देवतांची संचारी व यजमान मंडळी यांच्या हस्ते स्थापना, दुपारी महाप्रसाद, सायं. ७ वा. अरुण जायबा ठाकूर पुरस्कृत ‘पार्वती परिजय‘ यावर भाऊ नाईक यांचे कीर्तन, ९ वा. अॅड.सागर ठाकूर पुरस्कृत अचानक मंडळाचे भजन, रात्रौ ११ वा. पालखी प्रदक्षिणा, १२ वा. दत्तमाऊली दशावतार मंडळाचे ‘छिन्नमस्ता‘ हे नाटक होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
[…] नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असताना आणि त्यादृष्टीने सर्वपक्षीयांची तयारी सुरु असतानाच राष्ट्रवादीसह तृणमुल काँग्रेस आमि सीपीआयला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता केवळ प्रादेशिक पक्ष असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. दुसरीकडे देशभरात पॉवरफुल्ल कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मठ-येथे-पुनःप्रतिष्ठा… […]