वेंगुर्ला प्रतिनिधी -मठ येथील श्री देव स्वयंभू मंदिरात महाशिवरात्री उत्सवनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, वरदशंकर पूजा, नामस्मरण, सायं.७ वा. दीपोत्सव, रात्रौ ८ वा. ह.भ.प.भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, रात्रौ १० वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ११.३० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘अघोर शिव‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेनेची-मुलूख-मैदान-तो/
दि. १९ फेब्रुवारी रोजी स. ९ वा. उत्सवाची सांगता तसेच दुपारी १२ वाजता भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव स्वयंभू (वगैरे) देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे केले आहे.