Sindhudurg: महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची दि.५ मार्चला झाराप येथे सभा

0
19
महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ५ मार्च रोजी झाराप-नेमळे ब्रिज जवळील हॉटेल आराध्य‘ (कुडाळ) येथे आयोजित केलेली आहे.

या सभेमध्ये काजू उद्योगाला आवश्यक असणारे वेगवेगळ्या मशीनरी चे २६ स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या सभेस महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनच्या व्यासपिठावर कर्नाटक कॅश्यू असोसिएशनचे आजी-माजी ४ अध्यक्ष, गोवा कॅश्यू असोसिएशन अध्यक्ष, ओरिसा कॅश्यू असोसिएशन अध्यक्ष असे हे सर्व महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष समवेत उपस्थित राहणार आहेत. या सर्वात मोठ्या संधीचा फायदा म्हणजे हे प्रदर्शन महाराष्ट्रातील काजू उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व काजू उद्योजकांच्या ज्ञानात भर पडणार आहे. ही संधी न गमावता आपल्यासोबत नवीन उद्योगांना असोसिएशन सभासद करून घेणार आहे. सर्वांनी सभासद वाढविण्यासाठीची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील काजू संघटना मजबूत होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-दोडामार्ग-जिल्हातील-शे/

माजी खासदार निलेश राणे यांनी काजू उद्योगाच्या थकित कर्जाच्या पुनर्ररचनेबाबत व काजू उत्पादकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्य शासनाकडे तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. काजू प्रक्रिया उद्योग हा कोकणातील अर्थव्यवस्थेचा आणि रोजागार निर्माण करणारा उद्योग असल्याने कोरोना काळात तो संकटात सापडला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या कृषिपशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय व मस्य व्यवसाय विभागाने शासन निर्णय काढून राणे यांनी केलेल्या विविध शिफारशींवर कार्यवाही करण्याबाबत अध्यादेश जारी केला होता.  यावर शासनाकडून झालेल्या कार्यवाहिमुळे काजू उद्योग व उत्पादकांना न्याय मिळाल्याने त्यांचे महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशतर्फे आभार मानण्यात केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here