सावंतवाडी – कोल्हापूर येथील रा.शि.गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांच्या ३१ कलाकृतींची निवड ६२ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. उपयोजित कला प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि मूलभूत अभ्यासक्रमांकसोबत गुणवत्ता प्रमाणपत्र चार विद्यार्थ्यांना जाहीर झाले आहे. यात आंबोली येथील शुभम शशिकांत गावडे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-भोगवेहून-वालावल-मार्गे/
हा समारंभ विबवेवाडी पुणे येथे 3 फेब्रुवारी ला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रा.शि.गोसावी विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा अमर चौगुले हिला प्रथम क्रमांक तर शुभम शशिकांत गावडे आणि प्रतीक्षा लोहार याना गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. मूलभूत अभ्यासक्रम मध्ये गणेश राणे याला पारितोषिक जाहीर झाले आहे. आंबोली येथील सोसायटी चेअरमन आणि हायस्कूलचे संचालक येथील प्रमुख गावकर शशिकांत गावडे यांचे पुत्र शुभम गावडे यांची राज्यस्तरीय प्रथम गुणवत्ता प्रमाणपत्र निवड झाल्याबद्दल आंबोली ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आहे.