उन्हाळ्यातही विजेचा लपंडाव सुरूच ; दोन दोन टाॅवर असूनही नेटवर्क गायब
केळूस – केळूस – आंदुर्ले पंचक्रोशीत बीएसएनएलचे दोन टाॅवर आहेत पैकी एक अचानक कधीपण बंद पडतो तर दुसरा धीमागतीचा आहे आणि फक्त विजेवर चालताे. विज गायब झाली कि रेंज गायब होते. महावितरणची विज तर वरचेवर गायब होत असते. साधे चिटपाखरू बसल्याने सुध्दा विजेचे खांब कोलमोडतात. विज पूर्ववत करण्यात दोन -दोन दिवसाचा अवधी लागताे. याला कारणीभूत कोण? वितरणचे कर्मचारी की अधिकारी? आपण लोक सेवक आहोत लोकशाहीत जी आपण सेवा करतो त्या बदल्यात आपल्याला मोबदला मिळतो हे ते जाणीवपूर्वक विसरत असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-१२-हजार-शेतकऱ्यांचे-बँक/
पुर्वी विज बिले हि माफक व त्रैमासिक असायची. आता वेगवेगळे चार्जेस लादुन भरमसाठ विजबिल आकारली जात आहेत. पण विजेचा खेळखंडोबा मात्र चालूच आहे. पावसाळ्यात एकवेळ समजून घेता येईल पण आता काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. आठवडाभरापुर्वी केळुस- मुणगी भागातील रात्रीपासून गेलेली वीज दु.चे 3 वाजेपर्यंत गायबच होती. असे वीजगायब होण्याचे प्रकार पंचक्रोशीत वरचेवर घडत असतातच कोणाकडे चौकशी करावी तर नेटवर्क गायब असते. नेटवर्क असेल तर फोन उचलला जात नाही. चुकुन उचललाच तर खोटे सांगितले जाते. तरी महावितरण तसेच दुरसंचार निगमने या समस्या सोडवून केळूस मुणगी ग्रामवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


