वेंगुर्ला प्रतिनिधी – मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात २ ते ६ एप्रिल या कालावधीत सार्वजनिक हनुमान जयंतीचे आयोजन केले आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसोबतच दशावतारी नाटके, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ असे कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिवरायांनी-परस्त्री-ही/
दि.२ रोजी सायं.७ वा. रामेश्वर द.ना मंडळाचे ‘गरुड गर्वहरण‘ हे नाटक, दि.३ रोजी सायं.७ वा. दत्त माऊली द.ना.मंडळाचे ‘कुक्कुटेश्वर महिमा‘ हे नाटक, दि.४ रोजी सायं.७ वा.वावळेश्वर द.ना.मंडळाचे ‘स्त्री वेशधारी गणेश‘ हे नाटक, दि.५ रोजी ‘सीता हरण‘ हा कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम, दि.६ रोजी पहाटे ४.३० वा. मारुतीची पूजा व अभिषेक, पहाटे ५ वा.ह.भ.प.डॉ.रमेश पाटकर यांचे सुश्राव्य किर्तन, ६ वा. श्री हनुमान जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद, सायं.५ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, सायं.७ वा.आजगांवकर द.ना.मंडळाचे ‘वृषकपी‘ हे नाटक होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे केले आहे.