Sindhudurg: मालवण तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी बजेट अंतर्गत ४२ कोटी रु.निधी मंजूर

0
15
अतिवृष्टी
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीग्रस्तांना शासन निर्णयानुसार १० हजार रु.ची तातडीची मदत मिळवून द्या - आ. वैभव नाईक

आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे बजेट २०२३-२४ अंतर्गत मालवण तालुक्यातील देवबाग,तळाशील तोंडवली,सर्जेकोट,वायरी, धुरीवाडा,मसुरकर खोतजुवा,निशान काठी याठिकाणच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.या कामांसाठी एकूण ४२ कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे व निधी पुढीलप्रमाणे आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आरोग्य-सेविकांच्या-भरत/

देवबाग येथे समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे भाग – २ ता.मालवण रु. ५ कोटी

देवबाग विठ्ठल मंदिर ते ख्रिश्चनवाडी येथे समुद्राकडील बाजूस समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे ता.मालवण रु. ५ कोटी

देवबाग श्रीकृष्ण वाडी येथील बापू राऊळ घर ते अरविंद राऊळ पर्यत खाडीकनारी धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे ता.मालवण रु. ३ कोटी

तळाशील तोंडवली येथे श्री. विलास झाड घर ते श्री. गोविंद पेडणेकर घरापर्यंत धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे ता.मालवण रु. ५ कोटी

सर्जेकोट सुर्वणकडा येथे समुद्र किनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे. भाग-२ ता.मालवण रु. ५ कोटी

वायरी भूतनाथ तेली पाणंद ते माडये घरापर्यंत सरंक्षक भिंत बांधणे ता.मालवण रु. ५ कोटी

मालवण नगर परिषद हद्दीतील धुरीवाडा जामसंडेकर घर ते कुरण पर्यंत खाडी किनारी बंधारा कम जोड रस्ता करणेता.मालवण रु. ५ कोटी

वायरी भूतनाथ तेली पाणंद ते निशानकाठी समुद्र किनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे ता.मालवण रु. २ कोटी

मसुरकर खोतजुवा येथे धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे ता.मालवण रु. ३ कोटी ५० लाख

निशान काठी ते तारकर्ली येथे समुद्र धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे.ता.मालवण रु. ३ कोटी ५० लाख या कामांचा समावेश आहे.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here