Sindhudurg: राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या सर्वां‍गिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना

0
17

राजाराममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वां‍गिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविल्या जातात. सन 2022-23 समान व असमान निधी योजनांसाठी विविध प्रस्ताव www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर Online (ऑनलाईन) पध्दतीने अपलोड करून आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंन्दी भाषेत प्रस्ताव चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, या कार्यालयास दि. 28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावित, असे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी गो. इंगोले यांचेकडून करण्यात आले आहे.

सन 2022-23 साठीच्या समान निधी व असमान निधी योजना पुढील प्रमाणे आहेत. इमारत बांधकाम व विस्तर अर्थसहाय योजना. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य. राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय. महोत्सवी वर्ष जसे 50,60,75,100,125, 150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय. राष्ट्रीस्तरीय चर्चासत्र ,कार्यशाळा, प्रशिक्षण वग्र व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथलाय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय. या समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यसाठी विहित नुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सन 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थाळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here