वेंगुर्ला प्रतिनिधी- रेडी माऊली मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे यासाठी २.५० कोटी तसेच रेडी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभिकरण करण्यासाठी २.५० कोटी असा ५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-अशिया-खंडातील-ऐतिहासिक/(opens in a new tab)
पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२-२३मध्ये जिल्हास्तरीय कामांसाठी २१६३०.५१ लक्ष एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन १०८१५.१९ लक्ष एवढा निधी सन २०२२-२३ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यास शासनाकडून मान्यता दिली आहे. राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात वरील कामांना मंजुरी दिली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण तसेच भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सदर कामांना पक्षाच्यावतीने शिफारस दिली व पाठपुरावा केल्याबद्दल भाजप पक्षाचे आभार मानण्यासाठी यांनी भाजपा वेंगुर्ला कार्यालयात भेट देऊन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावेळी रेडी माऊली मंदिराचे विश्वस्त संदिप राणे, जिल्हापरिषद सदस्य प्रितेश राऊळ, देवस्थानचे मानकरी भानुदास राणे, आत्माराम राणे, सुहास राणे, अमोल राणे, कुणाल पिळणकर, प्रल्हाद रेडकर, मनवेल फर्नांडीस उपस्थित होते.
फोटोओळी – माऊली मंदिराच्या विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करुन आणल्याबद्दल प्रसन्ना देसाई व सुहास गवंडळकर यांचे अभिनंदन केले.


