Sindhudurg: लक्झरी अपघातातील जखमींची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आ. वैभव नाईक यांनी केली विचारपूस

0
107
लक्झरी अपघातातील जखमींची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आ. वैभव नाईक यांनी केली विचारपूस

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

कणकवली- कणकवली येथील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज पहाटे पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून जखमी प्रवाशांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सागरमालातून-होणार-१२-बं/

सकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट देत जखमी प्रवाशांची विचारपूस केली. डॉक्टर व नर्स यांच्याशी चर्चा करत जखमींची उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी संकेत नाईक, सचिन आचरेकर, नितीन राऊळ उपस्थित होते.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here