सिंधुदुर्ग नगरी-: कुडाळ नगरपंचायत हद्दीतील लक्ष्मीवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मार्फत गॅस साठवणूक करण्यासाठी स्टोरेज हाऊस प्रकल्प उभारला गेला आहे. हा प्रकल्प अडचणीचा ठरत आहे. याबाबत कुडाळ नगरपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाही करण्यात झाली नाही. https://sindhudurgsamachar.in/maharahstra-राज्यपाल-कोश्यारी-होणा/
हा गॅस स्टोरेज हाऊस प्रकल्प लोकवस्ती तसेच वर्दळीच्या जागेतून स्थलांतरित करावा कारण भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील प्रकल्प रद्द करावा, अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका चांदणी कांबळी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.