वेंगुर्ला प्रतिनिधी – माता सुरक्षित तर घर सुरक्षित अंतर्गत व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून उफद्र वजराट येथे गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रेमानंद भोसले, ग्रामसंघ अध्यक्षा शुभांगी सावंत-भोसले, डॉ.अभिजित वणकुद्रे, आरोग्य सेविका स्वाती धर्णे, आरोग्य कर्मचारी शेखर कांबळी, आशाताई रेश्मा धर्णे, रजनी वेंगुर्लेकर, श्रद्धा देसाई, राधाई घोणे, मदतनीस रुक्मिणी भोसले यांच्यासह सर्व गरोदर माता व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी – वजराट येथील गरोदर मातांच्या तपासणी शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य प्रेमानंद भोसले यांच्या हस्ते झाले.

