Sindhudurg: “वाचन प्रेरणा दिन” साजरा

0
40

ओरोस :माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त “वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज “वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सदर ग्रंथप्रदर्शन सार्वजनिक सुट्टी वगळता दि. 18 ऑक्टोबर २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

यावेळी जिल्हा ग्रथांलय अधिकारी सचिन हजारे, तांत्रिक सहायक प्रतिभा ताटे यांच्यासह जिल्हा ग्रंथालयातील कर्मचारी उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण इत्यादी विविध विषयांचे ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी यांनी सहभाग घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here