Sindhudurg: विविध रंगतदार कार्यक्रमांनी सजले साहित्य संमेलन

1
165
विविध रंगतदार कार्यक्रमांनी सजले साहित्य संमेलन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका येथील साहित्य संमेलनाच्या दुस-या सत्रात किरातच्या संपादिका सीमा मराठे यांनी वि.वा.शिरवाडकर लिखित वीज म्हणाली धरतीला‘ या नाटकातील राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारून उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवली. याचे निवेदन निर्जरा पाटील हिने केले.

त्यानंतर सांगलीहून आलेले कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या  कवीसंमेलनात सिंधुदुर्गातील बारा कवींचा सहभाग होता. विठ्ठल कदम, सुधाकर ठाकूर, सरिता पवार, स्नेहा राणे, श्वेतल परब, विनय सौदागर, कल्पना बांदेकर, मनोहर परब, प्रमोद कोयंडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना कवी आनंदहरी यांनी आपल्या दोन कविता सादर केल्या. कविता ही आतून येते. कवितेची मुळ खोलवर गेलेली असतात. कवितेने आतून यावे व वाचकांच्या मनाला भिडावे.  वेदनेतून कविता निर्माण झाली पाहिजे. भोवतालचे वास्तव कवितेत आले पाहिजे असे सांगितले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-निबंध-स्पर्धेत-कुडाळचे/

 समारो कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेतील यशस्वी क्रमांकाना प्रमाणपत्र, रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात कार्यकर्ता सन्मान सोहळा करण्यात आला. यामध्ये आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या सुरूवातीच्या काळात ज्यांचे योगदान लाभले त्यांना शाल श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात मंगेश गावडे, राकेश वराडकर, सचिन वराडकर, सुरेश कौलगेकर, ज्ञानेश करंगुटकर आदींचा समावेश होता. तसेच साउंड सिस्टीम पुरविणारे भानूदास मांजरेकर, पुस्तक स्टॉल लावणारे सचिन मणेरीकर, संदीप खानोलकर, ऐतिहासिक नाण्यांचा स्टॉल लावणारे ओंकार कदम यांचा तसेच साईमंगल कार्यालयाचे मालक अंबरीश मांजरेकर यांनी विनामूल्य केलेल्या सहकार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 मोठ्या साहित्य संमेलनाचीच छोटी प्रतिकृती असलेल्या या साहित्य संमेलनात सभागृहाच्या समोरील भिंतीवर चित्रकार सुनील नांदोस्कर यांनी स्वहस्ताक्षरात सजवलेल्या मराठीतील जुन्या कवितांचे फलक होते. यामुळे  साहित्य संमेलनाच्या सभागृहात उत्तम वातावरणनिर्मिती साधली होती. संजय घोगळे यांचे संजयची चावडी‘ या नावाचे व्यंगचित्र प्रदर्शनही लावलेले होते.

वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून साकारलेला रंग तरंग‘ हा कार्यक्रम रसिकांना खिळवून ठेवणारा होता. यामध्ये मराठी साहित्यातील  विविध वाङ्मय प्रकार घेतले होते. संत साहित्यातील ओवी व अभंग हे वृत्तांचे प्रकार सांगत असताना प्रितम ओगलेमाधवी मातोंडकर व राजश्री परब यांनी जनाबाईंची जात्यावरील ओवी सादर केली. आर्या आजगावकर हिने नामदेवांचा येई हो विठ्ठले‘ हा अभंग सादर करून वाहवा मिळवली. संत वाङ्मयातील पहाटेच्यावेळी मोरपिसांची टोपी घालून चिपळ्या वाजवत नाचत येणारा वासुदेव महेश राऊळ यांनी सादर करून दाद मिळवली. त्र्यंबक आजगांवकरमुकूंद परब व चंदन गोसावी यांनी सादर केलेले भारूड नृत्य दाद मिळवून गेले. पंत वाङ्यातील नरेंद्र कवीचा आदर्श निवेदनातून सांगून झाल्यावर निवेदक शाहिरी वाङ्मयाकडे वळतो आणि सिंधुदुर्गातील प्रसिद्ध नृत्यांगना सायली राऊळ हिने  चला जेजुरीला जाऊ‘  हे लावणीनृत्य सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. अंकुश आजगावकर व सहकारी यांनी शाहिरी वाङ्मयातील सादर केलेला पोवाडा दर्शकांना प्रभावित करून गेला. मळेवाड येथील ज्ञानदीप कलामंच यांनी डोळे दिपवून टाकणारे सादर केलेले वारकरी नृत्य सर्वानाच भारून टकणारे होते. विविध रंजक कार्यक्रमातून मराठी भाषेतील विविध टप्पे व त्यांची वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न यातून झाला.

      यावेळी  साहित्य संमेलनाला भाई मंत्रीसचीन वालावलकरगोविंद  उर्फ विजू गावडेसंजय पुनाळेकरस्वप्नील वेंगुर्लेकरप्रदीप केळुसकर आणि इतर अनेकांनी सहाय्य केले. तसेच प्रा.सचीन परूळकरसंजय पाटीलप्रा.आनंद बांदेकरमहेश राऊळ, सीमा मराठेप्रितम ओगलेगुरुदास तिरोडकर इत्यादी आनंदयात्रीनी संमेलनासाठी खूप मेहनत घेतली आहे,असे वृंदा कांबळी यांनी सांगितले.

फोटोओळी – साहित्य संमेलनाच्या दुस­-या सत्रात सीमा मराठे यांनी वि.वा.शिरवाडकर लिखित वीज म्हणाली धरतीला‘ या नाटकातील राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारुन नाट्यप्रवेश सादर केला.

1 COMMENT

  1. […] महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळत त्यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-विविध-रंगतदार-कार्यक्… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here