Sindhudurg: वेंगुर्ला तालुकास्तरीय भंडारीच्या क्रिकेट स्पर्धेत दक्ष उभादांडा विजेता

0
49

वेंगुर्ला प्रतिनिधी- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला आयोजित वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यात दक्ष उभादांडा संघ विजेता ठरला. या संघास मंडळाकडून ‘वेंगुर्ला भंडारी चषक‘ तर रमेश नार्वेकर व बाबली वायंगणकर यांच्याकडून रोख ११ हजारांचे बक्षिस देण्यात आले. तसेच स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या रेडी येथील माऊली गणेश संघास मंडळाकडून ‘वेंगुर्ला भंडारी चषक‘ तर अॅड.अरविद कुंडेकर यांच्याकडून रोख ७ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-बीपीसीएलचे-दिल/

 स्पर्धेतील मालिकावीर जितेंद्र नागोजी (रेडी) व सामनावीर प्रतिक गवंडे (परबवाडा) यांना चंद्रकांत आजगांवकर यांच्याकडून रोख ५००उत्कृष्ट फलंदाज तेजस जुवलेकर (उभादांडा) याला अमेय नवार यांच्याकडून रोख ५००उत्कृष्ट गोलंदाज सुरेश मांजरेकर (उभादांडा) याला बाळू धुरी (वेंगुर्ला) यांच्याकडून रोख ५०० व वरील सर्वांना भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाकडून वेंगुर्ला भंडारी चषक २०२३‘, उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर (उभादांडा) व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भूषण गडेकर (रेडी) याला भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाकडून वेंगुर्ला भंडारी चषक २०२३‘ देण्यात आले.

 स्पर्धेला समालोचक म्हणून सागर कदमसंतोष मोर्येराजा परबगुणलेखक ओंकार मोर्येविशाल मोर्येतन्मय जोशीपंच सुधीर सारंगयशवंत किनळेकरराजू गवंडेनाना राऊळबबी कानडे यांनी काम पाहिले.  

 बक्षिस वितरण प्रसंगी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकरमहासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकरसचिव विकास वैद्यतालुका सरचिटणीस डॉ.आनंद बांदेकररमेश नार्वेकरजयराम वायंगणकरबाबली वायंगणकरगजानन गोलतकरआनंद केरकरबबन नार्वेकरश्रेया मांजरेकरभरत आळवेसत्यवान साटेलकरयशवंत किनळेकरसुरेश धुरीकमलाकार नवारजया चुडनाईक आदी उपस्थित होते.

फोटोओळी – भंडारी समाजाच्या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या दक्ष उभादांडा या संघास गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here