वेंगुर्ला प्रतिनिधी- आधार फाऊंडेशन-सिधुदुर्ग, वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड रिसर्च व हेल्थ सेंटर-वेंगुर्ला व वेंगुर्ला गॅस सव्र्हस आयोजित जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या हॉलमध्ये सकाळी ९ ते २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कुडाळ-हायस्कूल-इंग्लिश/
या शिबिरावेळी कोल्हापूर अथायु हॉस्पिटलचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ.बसवराज कडलगे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.जिनेश्वर कपाले, जनरल मेडिसीन डॉ.रुपाली कपाले, युरॉलॉजी डॉ.राहूल पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भुषण सुतार, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.विनायक रायकर, सिधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.शाम राणे, शल्यचिकित्सक डॉ.एस.एस.लिहीतकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.डी.व्ही.करंबळेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसुती रोगतज्ज्ञ डॉ.डी.व्ही.करंबळेकर व डॉ.सुजय निगुडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिधुदुर्गचे फिजिशियन डॉ.स्नेहल सावंत व डॉ.दिक्षा पवार तसेच लाईफटाईम हॉस्पिटल पडवेचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.पूर्वा राऊत, दंतरोगतज्ज्ञ डॉ.ऐश्वर्या जगताप, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.संजय जोशी उपस्थित राहून रुग्ण तपासणी करणार आहेत.
या शिबिरासाठी वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ, वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळ, वेंगुर्ला मच्छिमार सोसायटी, वेंगुर्ला पोलिस स्टेशन यांचेही सहकार्य मिळाले आहे. इच्छुकांनी नावनोंदणी संगीता कुबल (९४२२०७०६३२), विवेक खानोलकर (९४२२४३४३८८), नंदन वेंगुर्लेकर (९४२२४३४३५६) यांच्याकडे करावी.