वेंगुर्ला प्रतिनिधी- मठ हायस्कूल येथे दि.२१ व २२ एप्रिल या कालावधीत दोन दिवशीय सर्वांगिण विकास शिबिर घेण्यात आले. उद्घाटन सरपंच रुपाली नाईक यांच्या हस्ते झाले. शिबिराची सुरुवात माजी सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नूतन मराठा हितवर्धक संघाचे गिरीष पोईपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पोलिसी-बळाचा-वापर-करून-ब
या शिबिरात श्रावणी धुरी, रेणुका बोवलेकर, अक्षदा गावडे व रश्मी भगत यांनी योगाचे, विजय टेपुगडे यांनी लाठीकाठीचे, अजित नगरकर यांनी व्यक्तिमत्व विकासाचे, किशोर सोनसुरकर यांनी रस्सीखेच व एरोबिक्सचे, अतुल वाढोकर, दिगंबर मोबारकर, अनिकेत कांबळे, नरेंद्र नाईक यांनी पेटांक्यूबाबत प्रशिक्षण दिले. तर विनायक खोत यांनी गड-दुर्ग संरक्षण व संवधर्नाबाबत, प्रतिक्षा पोईपकर यांनी शेतीतील नवनव्या प्रयोगावर, समिर पेडणेकर यांनी चित्रकला कौशल्याबाबत, गणुराज गोसावी, स्वप्नाली कांबळी व दुहिता साखळकर यांनी विषय माझ्या आवडीचा याबाबत मार्गदर्शन केले.
उद्घाटनप्रसंगी मुख्याध्यापक सुनिल जाधव, नुतन मराठा हितवर्धक संघाचे मिलिद खानोलकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सतिश गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समिर गडेकर उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबई आणि शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी – शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.