वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी स्वाती बांदेकर तर कार्याध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी महिला मंचाची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-माहेश्वरी गवंडे, खजिनदार-रुपा शिरसाट, सचिव-मंजिरी केळजी, सांस्कृतिक विभागप्रमुख संजना तेंडोलकर, उपक्रम विभागप्रमुख-दिव्या आजगांवकर, सहल विभागप्रमुख संध्या करंगुटकर तर सभासदत्व विभाग प्रमुख रिया केरकर व हेमा मठकर यांचा समावेश आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यातील-नाट्यकर्म/
दिव्या आजगांवकर यांनी वर्षभरातील कामकाज आणि उपक्रमांचा आढावा घेतला. महिला एखाद्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येतात त्याचवेळी महिलांच्या विकासाल गती मिळते. महिलांमध्ये सामाजिक जाणिव आणि आत्मविश्वास विकसित होण्यासाठी संघटन खूप महत्त्वाचे असल्याचे मंगल परुळेकर यांनी सांगत महिलामंचातर्फे संस्थाभेटी, कार्यशाळा, व्याख्याने व उपक्रम राबविले जातील अशी माहिती दिली. सावित्रीबाईंच्या ओवीने या बैठकीचा समारोप झाला.
फोटो – स्वाती बांदेकर, साक्षी वेंगुर्लेकर