वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला भाजपा कार्यालयामध्ये पार पडलेल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या झालेल्या जिल्हा बैठकीत अनुसूचित जाती जमातीमधून निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-भंडारी-समाजाच्या-क्रिक/
यामध्ये प्रांजल जाधव (शेर्ले), बाळा जाधव (आसोली), सुशिल कदम (तरंदळे), अजित पवार (जानवली), प्रणाली खानोलकर (खानोली), स्नेहल कासले (केसरी) या सरपंचांचा तर गुणाजी जाधव (तेर्सेबांबर्डे), गुरुनाथ कासले (केसरी), प्रकाश कदम (साटेली), सोनिया मठकर (मठ), स्नेहल पालकर (पाल), वर्षा आडेलकर (आडेली), सुनिलदत्त जाधव (तरंदळे), भिकाजी कदम (सांगेली), गुरुप्रसाद चव्हाण (म्हापण) या सदस्यांचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे चंद्रकांत जाधव, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, भुपेश चेंदवणकर, अनंत आसोलकर, गुरुप्रसाद चव्हाण, बंटी जाधव, दादा केळुसकर, मनवेल फर्नांडीस, रविद्र शिरसाठ आदी उपस्थित होते.
डॉ.आंबेडकर यांच्या जयंती व गुढीपाढव्यानिमित्त राज्यातील १.६३ कोटी जनतेला १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा‘ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याबद्दल अन्न नागरी पुरवठा मंत्री व पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचा अभिनंदनाचा ठराव या सभेत घेण्यात आला.
फोटोओळी – भाजपाच्या अनुसुचित जाती जमातीतील सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.