वेंगुर्ला -सुरेश कौलगेकर
सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३५ वा वार्षिक ‘व्यापारी एकता मेळावा‘ मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. वेंगुर्ले येथे या मेळाव्याने सलग पाच वेळा व्यापारी मेळावा घेण्याचे यजमानपद मिळाले आहे. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-रत्नागिरी-जिल्ह्यातून/
या मेळाव्याचे उद्घाटक उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री याच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार, पालकमंत्री रविद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत हे विशेष निमंत्रित मान्यवर तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी व वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, सारस्वत बँक संचालक सुनिल सौदागर हे उपस्थित रहाणार आहेत. तर जीएसटी कौन्सिलचे सदस्य सीए. उमेश शर्मा, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, राष्ट्रीय समिती सदस्य विजय केनवडेकर यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.
सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत उद्घाटन, मान्यवरांची मनोगते, प्रमुख वक्त्यांचे विचार, महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार वितरण, कै.माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार वितरण, अध्यक्षांचे मनोगत, दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत प्रमुख वक्त्यांचे विचार, जिल्ह्यातील नवउद्योजकांशी गप्पा, कै.प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार प्रदान, सर्वोत्तम तालुकाध्यक्ष पुरस्कार प्रदान, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान, भेटवस्तूंची सोडत व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत.
आज व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर ज्येष्ठ व्यापारी अनिल सौदागर तसेच सर्व व्यापारी संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे मेळाव्याच्या पूर्वसंध्येला जाऊन पाहणे केली वहा एकता मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापना व दुकाने बंद ठेवून एकता मेळावा यशस्वी करावा तसेच जास्तीत जास्त व्यापारी संघाची सदस्य संख्या वाढवावी यासाठीही या वेंगुर्लीतील मेळाव्यात एकजूट दाखवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले
सिधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या एकजुटीचे प्रतिक म्हणून साजरा होणा¬या वेंगुर्ला व्यापारी व व्यावसायिक संघ आयोजित या व्यापारी एकता मेळाव्यास जिल्ह्यातील व्यापा¬यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.